अरबी समुद्रात भुकंप होण्याची शक्यता !!
अरबी समुद्रात भुकंप होण्याची शक्यता.. भारतासह 11 देशांना बसणार फटका
रायगड - आशिया खंडातील जवळपास 11 देशांसह आखाती देशांना सीशम वादळासह त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2017 पुर्वी अरबी समुद्रात भुकंप होवून ताशी 120 ते 180 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सीशमचे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हा अंदाज तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए. एस. पीचे संचालक बाबू कालयील यांनी वर्तविला आहे. बाबू कालयील यांनी यासंबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून पुढील संशाधनासाठी मदतीची मागणी केली आहे. या भूकंपाचा धक्का जगातील 11 देशांना बसणार आहे. यामध्ये भारत, चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
त्याचबरोबर या समुद्रातील भूकंपाची झळ आखाती देशांना बसेल, अशी शक्यताही या रिसर्च सेंटरने वर्तविली आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी संभाव्य धोका कळविला आहे. अद्याप या पत्राला पंतप्रधानांकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे संचालक बाबू कालयील यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या नावगाव, आवास, सासवणे या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात समुद्रातील मासे कमी पाण्यात आश्रय घेण्यासाठी आढळून आले. समुद्रातील मासे 30 सप्टेंबर रोजी किनारा गाठत असल्याने रायगड जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
लोकज्योतिर्विद असणारे कोळी बांधवांच्या माहितीनुसार असा प्रकार 46 वर्षांपूर्वी घडला होता. असे असताना जाणकार कोळी बांधवांनी हा समुद्री भूकंपाचा इशारा असल्याचे सांगितले आहे. भविष्यात समुद्रात भूकंप होण्याची चिन्हे आहेत, हा कोळी बांधवांचा कयास असला, तरी त्याला तामिळनाडू येथील भूगर्भीय आणि खगोल शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने पुष्टी दिली आहे. मात्र, प्रशासन अद्याप असे घडले कसे याचाच अंदाज बांधत आहे. भविष्यात समुद्रात भूकंप होणार असल्याचे तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर इ. एस. पी. या रिसर्च सेंटरने 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही माहिती कळवत पुढील संशोधनासाठी मदतीची मागणी केली आहे.
अरबी समुद्राअंतर्गत सुरू असलेल्या हालचालींचा अभ्यास करणारी केरळ येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर इ.एस.पी. संस्था असून या संस्थेचे रिसर्च सेंटर तामिळनाडू येथे आहे. अरबी समुद्रातील हालचालींचा अभ्यास करताना समुद्रात भूकंपाच्या हालचाली होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निरिक्षणात आले आहे. या हालचालींचा उद्रेक 31 डिसेंबर 2017 पूर्वी केंव्हाही होऊ शकतो, असे या रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नेमका भूकंप कधी होईल हे सांगण्याकरता अधिक शोध आणि अभ्यास करण्याची गरज आहे. यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता असल्याचे रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment