अरबी समुद्रात भुकंप होण्याची शक्यता.. भारतासह 11 देशांना बसणार फटका रायगड - आशिया खंडातील जवळपास 11 देशांसह आखाती देशांना सीशम वादळासह त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2017 पुर्वी अरबी समुद्रात भुकंप होवून ताशी 120 ते 180 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सीशमचे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हा अंदाज तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए. एस. पीचे संचालक बाबू कालयील यांनी वर्तविला आहे. बाबू कालयील यांनी यासंबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून पुढील संशाधनासाठी मदतीची मागणी केली आहे. या भूकंपाचा धक्का जगातील 11 देशांना बसणार आहे. यामध्ये भारत, चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे. त्याचबरोबर या समुद्रातील भूकंपाची झळ आखाती देशांना बसेल, अशी शक्यताही या रिसर्च सेंटरने वर्तविली आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी संभाव्य धोका कळविला आहे. अद्याप या पत्राला पंतप्रधानांकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे संचालक बाबू कालयी...