CLASS TEACHER
CLASS TEACHER ही सत्यकथा आहे. थानपन्नेर रेल्वे स्थानकाच्या बाहेर घडलेली. विद्या नमक एका लेडीने एक वृद्ध गरीब अनेक दिवसांपासून न जमवलेल्या महिलेला स्टेशन बाहेर पाहीलं तिच्याशी ती बोलली तीला जवळच्याच टि स्टॉल वरून थोडंसं खायला आणि पाणी आणून दिलं, खाता खाता विद्याने त्या वृद्धेला बोलतं केलं ती कुठून आली कोण आहे. इथं कशी आणि या छोट्याशा बातचीतून एक धक्कादायक बाब तीला समजली की ती एक शिक्षीका होती रिटायरमेंट नंतर तीची ही परिस्थिती झाली आहे ती शाळेत गणित शिकवायची वगैरे वगैरे.. ... विद्याने लगेच त्या शिक्षिकेची फोटोसह माहीती सोशल मीडियावर टाकली आणि काय अश्चर्य दुसऱ्या दिवशी तिला घ्यायला लांब लांबून तिचे शेकडो विद्यार्थी स्टेशनवर पोहचले.. ... अनेक विद्यार्थ्यांनी सांगीतलं की आज आम्ही जे काय आहोत ते या आमच्या टिचर मुळे आणि त्यांना आम्ही घेऊन जायला तयार आहोत.. या वरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या.. तुम्ही केलेलं प्रामाणिक काम वाया जात नाही. आजही शिक्षकांच्या बद्दल आदर आहे. "समाजात आजही चांगलीही माणसं आहेत". ...